Eknath Khadse | गिरीश महाजनांच्या विधानानंतर खडसेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, “गेस्ट हाऊसवरील भानगड…”

Eknath Khadse | मुंबई : भाजपाचे नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातील विकोपाला गेला आहे. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांचे पुत्र निखिल खडसे यांच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने खळबळ उडाली आहे. ‘खडसेंच्या मुलाने आत्महत्या केली की हत्या झाली. मला जास्त बोलायला लावू नका,’ असे महाजन म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याला एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे

एकनाथ खडसे म्हणाले, “महाजनांच्या वक्तव्यामुळे माझे कुटुंबीय दुखावले आहे. मला फार वेदना झाल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी महाजनांबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. “फर्दापूरच्या गेस्ट हाऊसमध्ये काय झाले होते, हे तेव्हा वर्तमानपत्रांत छापून आले होते. मात्र मी त्याचा कधीही उल्लेख केलेला नाही. महाजनांची कृत्यं मी डोळ्यांनी पाहिली आहेत”, असा दावा खडसेंनी केला आहे.

“गिरीश महाजन यांचे किती लोकांशी प्रेमाचे संबंध आहेत, याचाही मी कधी उल्लेख केला नाही. प्रेमाचे नाते असू शकते,” असं म्हणत एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केलीय. ते म्हणाले, “अत्यंत नीच आणि हलकट प्रवृत्तीने गिरीश महाजन यांनी असे प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर महाजन यांची मनोवृत्ती लक्षात येते.” मी गिरीश महाजन यांच्या मुलाबाबतीत कधीही बोललो नाही. तुम्ही माझ्या घरात घराणेशाही आहे, असे म्हणता. तर मग तुमच्या घरात काय आहे?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना केला आहे.

पुढे ते म्हणाले, “साधनाताई २७ वर्षांपासून सरपंच, जिल्हापरिषद सदस्य, १५ वर्षांपासून नगराध्यक्ष आहेत. तुम्हाला दुसरे कोणी मिळाले नाही का? तुम्हाला मुलगा असता तर सून आणि मुलगा असे दोघेही राजकारणात असते. मुलगा असता तर मी त्याला आशीर्वाद दिला असता, असे मी म्हणालो होतो.” असे असताना निखील भाऊची हत्या झाली की आत्महत्या, असे प्रश्न विचारणे चुकीचे आहे,” अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिलीय.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.