Eknath Khadse | “मदत करायची नसेल तर..”; एकनाथ खडसेंचा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर हल्ला

Eknath khadse | मुंबई : महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस (Rain) पडत आहे. यामुळे अनेक समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागतं आहे. त्याचबरोबर अचानक पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचंही खूप मोठ्या प्रमाणावर नुसकान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीकेली जात आहेत.यावर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले, सध्या राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाहीय. सत्तार यांच्या याच वाक्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांना खूप फटकारलं आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे (Eknath khadse)

शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर करा अन्यथा शेतकऱ्यांची टिंगल तरी करू नका, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी अब्दुल सत्तार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांची (Farmer) टिंगल करत आहेत, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम कृषिमंत्र्यांकडून होत आहे, असं खडसे म्हणाले.

तसेच, शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले असतांना त्यांना मदतीची गरज आहे. मात्र कृषीमंत्री मदत करायचे सोडून शेतकऱ्यांची टिंगल करत आहेत. कृषीमंत्री सत्तार यांच्या या विधानावरून शेतकारी वर्गात संतापाची लाट उसळली असून, शेतात गेल्या सहा महिन्यांपासून पाणी तुंबलेले आहे, त्यामुळे एकही पीक संपूर्णतः हाती लागत नसल्याचंही खडसे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार
यांनी आपल्या फेसबुक आकाऊंटवरून एक पोस्ट करत शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती सांगत, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.