Eknath Khadse । ‘अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका’; एकनाथ खडसे यांचं मोठं वक्तव्य!
Eknath Khadse । जळगाव : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभिमीवर सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. तर सुप्रीम कोर्टाकडून राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधीही जाहीर होऊ शकतोअशी चर्चा रंगू लागली आहे. या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार असल्याच्या चर्चा आहेत. या दरम्यान एकनाथ खडसे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. तर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आलं होत. याबाबत स्वतः अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत या विषयाला पूर्णविराम दिला होता परंतु, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले एकनाथ खडसे (What did Eknath Khadse say)
एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत दावा देखील केला आहे. तसचं ते अजित पवारांबाबत विचारलं असता म्हणाले की, अजित पवार हे भाजपमध्ये जातील, असं मला वाटत नाही. राष्ट्रवादी पक्ष मोठा करण्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे. अजित दादांचा पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा ते भाजपसोबत गेले नव्हते ते राष्ट्रवादीतच होते. तसचं उपमुख्यमंत्री होऊन वर्ष-वर्ष आपण कष्ट करतोय. त्यामुळे त्यांनी आपण मुख्यमंत्री होणार असल्याचं म्हटलंय. यात गैर काय?” असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. तर एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा कोणता आकड्याचा खेळ होता? हा तर खोक्यांचा खेळ जमला. अशी टीका देखील त्यांनी शिंदेंवर केली.
दरम्यान, खडसे यांनी भाजपवर आरोप करत म्हंटल की, “मी भाजपमधून राष्ट्रवादीत गेल्यानंतर भोसरी जमिनीचं प्रकरण माझ्यामागे लावण्यात आलं. वास्तविक या जमिनीच्या प्रकरणात कुठलंही तथ्य नाही. या प्रकरणाशी माझाही काहीही संबंध नाही. भाजप पक्षातून कोणीही बाहेर पडला कि त्याच्या पाठीमागे इडी लावली जाते. असा आरोप देखील एकनाथ खडसे यांनी केला. तसचं लवकरच सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल यातील 16 आमदार हे अपात्र झाले. तर राजकारणातलं चित्र आणखी बदलू शकत. जो 145 चा आकडा पूर्ण करेल तोच यानंतर मुख्यमंत्री होईल. कदाचित अजित दादा हे मुख्यमंत्री होण्याचा 145 चा आकडा जमवू शकतात. एकनाथ खडसे यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांचं लक्ष अजित पवारांवर लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Kishor Patil । “संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना संपवायची सुपारी तर घेतली नाही ना?” : किशोर पाटील
- Sanjay Raut | संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर गंभीर आरोप; म्हणाले…
- Supriya Sule | “दगडफेक करणं महाराष्ट्राचे संस्कार नाहीत”; सुप्रिया सुळेंचा गुलाबराव पाटलांवर हल्लाबोल
- Coronavirus Update । कोरोना रुग्णसंख्येत वाढ ‘या’ जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्या; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची सूचना
- Radhakrishna Vikhe Patil । “देवेंद्र फडणवीसचं आमच्या मनातील मुख्यमंत्री” : राधाकृष्ण विखे पाटील
Comments are closed.