Eknath Khadse । “पोलिसांकडून खोटा गुन्हा दाखल मला करून अडकवलं जातंय”; एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट
Eknath Khadse । जळगाव : भाजपमधून राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आज एक गौप्यस्फोट केला आहे. आपल्याला अटक करण्यासाठी मोठे षडयंत्र रचण्यात येत असल्याचा दावा खडसे यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. एकनाथ खडसे म्हणाले की, मला एका पोलिस अधिकाऱ्याचा फोन आला होता. त्याने सांगितले की, पोलिस यंत्रणेच्या सहाय्याने तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करून अटक करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. पोलिस अधिकाऱ्याने आपल्याला काही नावेही सांगितले.
पोलिस यंत्रणेच्या साह्याने मला अडकवण्याचे, माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून अटक करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. एलसीबीचा एक पोलिस जामनेरचा आहे, त्याची माहितीही मला शेअर केली आहे. जामनेरच्या पोलिस अधिकाऱ्याच्या माध्यमातून हे षडयंत्र रचण्यात येत असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांनी केला.
जळगावमध्ये सुडाचे राजकारण सुरू
खडसे म्हणाले की, जळगावमध्ये एकनाथ खडसे अडसर ठरत आहे. त्यामुळे सुडाचे राजकारण सुरू आहे. जळगावमध्ये एकनाथ खडसे उभे असले की, यांना एकही निवडणूक जिंकता येऊ शकत नाही. त्यामुळे अशाप्रकारे अटक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आपल्यासोबत असे यापूर्वीही घडलं असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे या धमक्यांना आणि षडयंत्रांना आपण घाबरणार नसल्याचं एकनाथ खडसे म्हणालेत.
काय आहे प्रकरण
जळगाव जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांची फिर्याद पोलिसांनी घेतली आहे. जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष मंदाकिनी खडसे यांनी एक आठवड्यापूर्वी मालाची तपासणी केली. यावेळी दूध संघातून १४ टन म्हणजे ८० लाखांचे पांढरे लोणी बाहेरच्या जिल्ह्यांत पाठविण्याचे भासविण्यात आले. प्रत्यक्षात माल बाहेर गेल्याबद्दलच्या नोंदी आढळून आली नाही. तर दूधाच्या पावडरच्या साठ्यात ३० ते ३५ लाख रुपये किंमतीच्या ३६० बॅगची तफावत आढळून आली आहे. असे एकंदरीत १ कोटी १५ लाख रुपयांच्या मालाची चोरी झाल्याचे तपासणीतून समोर आले. यानंतर मंदाकिनी खडसे यांनी दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची सूचना केली. पण दूस संघाची तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतली नाही आणि गुन्हाही नोंदवला नाही. हा प्रकार त्यांनी पती एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांच्या निदर्शनास आणून दिला.
यानंतर एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी हे जळगाव जिल्हा पोलीस ठाण्यात जाऊन धडकले. दूध संघातील मालाच्या चोरी प्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी, अशी मागणी खडसेंनी केली. आर्थिक गुन्ह्याचा प्रकार आहे. त्यामुळे खडसेंनी आपली तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे करावी, असे पोलिसांनी सांगितले. पण हा आर्थिक गुन्हा नसून गोदामातून माल चोरीला गेला आहे. यात कोणाचा हात आहे, त्यांची नावेही खडसेंनी पोलिसांना दिली.
महत्वाच्या बातम्या :
- Viral Video | ‘या’ युवकाला रस्त्यावर स्टंट करणे पडले महागात, पाहा व्हिडिओ
- Ramesh Kere । मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रमेश केरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न
- Sushma Andhare | ८७ मिनिट वाचन करायला जिगर लागते, आम्हाला अभिमान आहे आमच्या भावाचा
- Sushma Andhare | राज्य मिळवायचं असेल, तर ५० खोके घेता आली पाहिजेत, पळून जात आलं पाहिजे
- Eknath Khadse | तू कल का छोकरा है; खडसेंचा मंगेश चव्हाणांना इशारा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.