Eknath Khadse । बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादात एकनाथ खडसेंची उडी, म्हणाले…

Eknath Khadse । मुंबई : रवी राणा यांनी बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यावर, शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत, असे आव्हान दिले होते. यानंतर आता 1 नोव्हेंबरपर्यंत या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर मोठा बॉम्बच फोडणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी रवी राणा यांना दिला आहे. बॉम्ब कुठे आणि कसा फोडायचा हे आपल्याला बरोबर माहीत असल्याचं ते म्हणालेत. या वादात आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी देखील उडी घेतली आहे.

याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत एकनाथ खडसे यांनी मोठा दावा केला आहे. राज्यातील अपक्ष आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. बच्चू कडू यांनी त्याची सुरुवात केली असल्याचे खडसे म्हणाले. बच्चू कडू म्हणतात की, माझ्यासोबत सात ते आठ आमदार आहेत आणि आता सात आठ आमदार घेऊन ते बाहेर पडतात का हीच परिस्थिती शिंदे यांच्यासह असलेल्या 50 60 आमदारांची असल्याचा दावा खडसे यांनी केला आहे.

यानंतर पुढे एकनाथ खडसे म्हणाले कि, मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही त्यामुळे अनेक आमदार अस्वस्थ आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार न झालेले अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. त्यापैकीच एक बच्चू कडू पण आहेत. बच्चू कडू यांचे मंत्रिमंडळामध्ये नाव आहे. बच्चू कडू यांच्याबरोबर आणखी सुद्धा आमदार येण्याची शक्यता नाकारता येत नाही असा अंदाज ही त्यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्याः

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.