Eknath Khadse | “2019 साली मुख्यमंत्रिपदासाठी माझंच नाव..”; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

Eknath Khadse | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लक्ष्य केले आहे. जळगाव येथे पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना त्यांनी आपल्यावर झालेली कारवाई कट कारस्थानाचा भाग होती, असा आरोप पुन्हा एकदा केला आहे. मात्र यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात तुफान चर्चा रंगली आहे.

“मुख्यमंत्रिपदासाठी माझेच नाव” (After the 2019 elections, my name was being considered for the post of CM)

“2019 च्या निवडणुकीनंतर माझेच नाव मुख्यमंत्रिपदासाठी घेतले जात होते. मात्र त्याआधीच 2016 रोजी मला राजीनामा द्यावा लागला होता. माझ्यावर खोटे आरोप करुन मला राजीनामा देण्यासाठी भाग पाडले गेले. माझ्याविरोधात घडवून षडयंत्र रचले गेले. ज्या भूखंडाचा आरोप माझ्यावर ठेवला गेला, त्या भूखंडाशी माझा दुरान्वये संबंध नाही. मी तो जमीन व्यवहार केलेला नाही. मी ती जमीन पाहिलेली देखील नाही. मी फक्त त्या जमीनीबाबत बैठक घेतली होती. त्याचे प्रोसिडिंग तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केले होते. केवळ बैठक घेतली म्हणून माझ्या परिवाराची ईडी चौकशी करण्यात आली. त्याआधी लाचलुचपत विभागाने त्याची चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या चौकशीसाठी माझे जावई गेले असता त्याचदिवशी त्यांची अटक करण्यात आली. मला कोर्टाने संरक्षण दिले असल्यामुळे माझी अटक टळली होती.” असे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे.

मला अटक करण्याचा प्रयत्न” (Trying to arrest me)

राज्यात शिंदे फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर पुर्वीच्या समितीने जो अहवाल दिला होता, तो नाकारून पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी सरकारने केली. त्यावर न्यायालयाने सरकारला फटकारले असून तुमचा हेतू शुद्ध नसल्याचे सांगितले आहे. माझ्यावर अटकेची टांगती तलवार ठेवता येणार नाही, अशी भूमिका न्यायालयाने व्यक्त केली” असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

“आयकर विभागाने माझी दोन वेळा चौकशी केली, त्यात काहीच आढळून आले नाही. त्यानंतर पुन्हा लाचलुचपत विभागामार्फत दोन वेळा चौकशी झाली. त्यातही काही आढळले नाही. तरीही पुन्हा पुन्हा माझी चौकशी करण्यात येत आहे. कसंही करुन, काहीतरी शोधून मला अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे माझा संबंध नसलेल्या प्रकरणातही मला अटक करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो”, अशी शक्यताही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.

“चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होईल. पंढरपूर, कोल्हापूरची जागा बिनविरोध न करता भाजपने त्यांचे उमेदवार उभे केले होते. त्यावेळी भाजपला बिनविरोधची आठवण झाली नाही. पुण्यात अनेक खानदेशी लोक राहतात, त्यामुळे या दोन्ही पोटनिवडणूक जागेसाठी आम्ही जळगावचे पदाधिकारी प्रचारासाठी जाणार आहोत. मी स्वतः चार ते पाच दिवस तिथे प्रचार करणार आहे” एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-