InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘माझ्याकडे सर्व पुरावे,पक्षाध्यक्षांनी परवानगी दिली तर मी सर्वांना सांगेन’

गिरीश महाजन यांनी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. पाडापाडी करणाऱ्या पक्षातील नेत्यांची नावानिशी यादी मी वरिष्ठांकडे जमा केली आहे. पक्षाध्यक्षांनी परवानगी दिली तर मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ती सर्वांना सांगेन, असं उत्तर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिलं.

पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पक्षातील नेत्यांनीच पाडलं, असा आरोप एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्याला उत्तर देताना, भाजपमधील पाडापाडी करणाऱ्या नेत्यांची नावं जाहीर कराच, असं खुलं चॅलेंज गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिलं होतं.

Loading...

‘विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांना पाडणाऱ्यांची नावं एकनाथ खडसे यांनी पक्षश्रेष्ठींकडे दिल्याचं ते सांगत आहेत. त्यांनी ती नावं गुप्त न ठेवता पुराव्यानिशी थेट जाहीर करावीत’, असं चॅलेंज गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिलं होतं.

- Advertisement -

 

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.