एकनाथ खडसे यांची अवहेलना आम्हाला आवडली नाही – बाळासाहेब थोरात

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आमचे आवडते व्यक्तिमत्व आहे. त्यांची अवहेलना झाली, हे आम्हाला देखील आवडली नाही, अशी खंत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. भाजपच्या नेत्यांबद्दल एकनाथ खडसे यांनी उघड नाराजी दर्शविली होती.

सोमवारी ते आपले मत मांडण्यासाठी दिल्लीलाही गेले होते. आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. नाथाभाऊंना भाजपमध्ये डावलण्यात येत असल्याचे स्पष्ट असून, आता ते पुढे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याविषयी बाळासाहेब थोरात यांनी वक्तव्य केले आहे. पंकजा मुंडे चांगलं काम करत होत्या, त्यांची नाराजी मला माहित नाही. अशी माहिती यावेळी बाळासाहेब थोरात यांनी दिली.

महाविकास आघाडीच्या सरकारचे लवकरच खातेवाटप होणार असून, याबाबतची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली असल्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सरकारमधील ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी दिले. आपण रविवारी रात्री मुंबईत परत येत असून, आघाडीतील तीन पक्षांच्या नेत्यांशी अद्याप संपर्क होत नसल्यामुळे खातेवाटपाबाबत रविवार रात्रीपर्यंत निर्णय अपेक्षित नसल्याचे संकेतही त्यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.