एकनाथ खडसेंची समजूत काढण्यासाठी भाजपमध्ये हालचाली

भाजपमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची समजूत काढण्यासाठी भाजपमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. खडसे यांची समजूत काढण्यासाठी दिल्लीतील नेते भुपेंद्र यादव आणि राज्यातून विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी सोपवली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

खडसेंच्या दिल्लीतील शरद पवार भेटीनंतर अखेर भाजप पक्ष नेतृत्वाकडून गंभीर दखल घेतली गेली आहे. खडसेंना पक्ष सोडण्यापासून रोखण्यासाठी भाजपच्या या दोन नेत्यांना पाचारण केले असल्याची माहिती आहे. खडसेंच्या नाराजीमुळे ओबीसी – बहुजन दुखावले जाण्याची शक्यता असल्याने भाजपकडून यादव आणि तावडेंना खडसेंशी चर्चा करून वाद मिटवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान खडसे यांनी शरद पवार यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. भाजपमध्ये काही लोकांकडून सातत्याने अपमान होतोय. अपमान असाच सुरु राहिल्यास वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा खडसेंनी दिला होता.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.