InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहिले, म्हणूनच माझ्यावर ही वेळ – एकनाथ खडसे

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून विजनवसात असलेले भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. सावदा येथे अल्पसंख्याक समाजातर्फे एकनाथ खडसे यांचा नागरी सत्कार झाला. यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्याने आपली अशी अवस्था झाली आहे.

खडसे म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहिल्याने मी काहींसाठी नाआवडता झालो. एका मोठ्या व्यक्तीने मुस्लीम समाजाच्या जमिनीवर बांधलेले घर जमीनदोस्त करून ती जमीन सरकार जमा करण्याचा आदेश आपण दिला होता. मात्र ती व्यक्ती दुसरे कुणी नव्हे तर अंबानी निघाले. त्यांनी अनाथाश्रमाच्या जागेवर आपले निवासस्थान उभारले होते. वास्तविक, ती जमीन अल्पसंख्याक समाजाची असल्याने त्यांना मिळायला हवी होती. अशा अनेक मोठ्या जमिनी सरकार जमा करण्याचा निर्णय आपण घेतला होता. मात्र काहींना तो निर्णय रुचला नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणून माझ्यावर आज ही वेळ आली आहे.

Loading...

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.