रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडेंना जाणीवपूर्वक पाडले गेले; खडसेंचा गंभीर आरोप

भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने अंतर्गत राजकारणातून आणि यांना पाडले, असा खळबळजनक आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत कुरघोड्या तर झाल्याच, पण त्यांना पाडण्याचे उद्योग झाले, असा घणाघाती आरोप खडसेंनी केला.

रोहिणी खडसे यांना पाडण्यात आलंच, पण पंकजा मुंडे यांच्याही कार्यकर्त्यांचा असाच आरोप आहे, असं खडसे म्हणाले. इतकंच नाही तर खडसेंनी याबाबत पुरावे गोळा करुन, पाडापाडीचं काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वरिष्ठांकडे केली आहे.

“पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळेच पंकजा मुंडे यांना पाडण्यात आलं, इतकंच नाही तर त्यांच्याविरोधातील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनाही मदत पुरवण्यात आल्याचं पंकजांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे”, असं खडसेंनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.