Eknath Shinde | अमित शाह, बोम्मईंसोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

Eknath Shinde | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावादामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (basavraj Bommai) यांची विशेष बैठक बोलावली होती. ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिलीय.

ते म्हणाले, “दोन्ही राज्यांमध्ये, शांतता आणि सौहार्दाचे वातावरण व कुठल्याही प्रकारचा कायाद सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, अशा प्रकारच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांना दिल्या.” त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडलेल्या भूमिकेतून हे स्पष्ट झालेलं आहे. म्हणून तीन-तीन मंत्र्यांची समिती गठीत होईल. जे काही मुद्दे आम्ही मांडले मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणसांचे कार्यक्रम यावर कुठल्याप्रकारचा अन्याय होता कामा नये, अशा प्रकारची भूमिका आम्ही स्पष्टपणे मांडलेली असल्याचं एकनाथ शिंदे म्हणालेत.

पुढे ते म्हणाले, मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकात ज्या काही घटना होत होत्या, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या जनतेला त्रास होऊ नये, त्याचबरोबर मराठी भाषेचा सन्मान आणि मराठी माणसांवर कुठलाही अन्याय होऊ नये. अशाप्रकारची भूमिका राज्य सरकारची आमची होती आणि गृहमंत्र्यांनीही या चर्चेत व कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनीही ते मान्य केलं.”

दरम्यान, यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी बसवराज बोम्मई यांच्या ट्विटवरचा मुद्दा देखील स्पष्ट केला आहे. ते म्हणाले, “आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याच्या ट्वीटर आणि विधानांबद्दल मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चाही केली. त्यांनी त्यावर स्पष्टपणे सांगितलं की हे माझं विधान नाही, ते ट्वीटर ह्रॅण्डल माझं नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही विधान केलेलं नाही.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.