Eknath Shinde | “अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा”; मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश
Eknath Shinde | मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस (Untimely Rains) झाल्याने अनेक पिकांना फटका बसला आहे. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
“नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा”
“राज्यभरात काल ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे. यादृष्टीनं महसूल यंत्रणेनं लगेच कामाला लागावं आणि पंचनामे करावेत”, असेआदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
Eknath Shinde orders District Collectors
ठाणे, पालघरसह राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्यानं बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Sandeep Deshpande | “मज्जा आहे बाबा एका माणसाची आता पंतप्रधान..”; संदीप देशपांडेंच्या ठाकरेंना खोचक शुभेच्छा
- Sanjay Shirsat | “राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय मला पूर्ण विश्वास”; राऊतांच्या ‘त्या’ दाव्यावर शिरसाटांची प्रतिक्रिया
- Rain Update | राज्यात ‘या’ भागात विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज
- Job Opportunity | इलेक्ट्रॉनिकल्स टेक्नॉलॉजी मटेरियल्स सेंटरमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Milk and Coffee | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी दूध आणि कॉफीचा ‘या’ पद्धतीने करा वापर
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.