Eknath Shinde | “आम्ही उघडपणे दर्शनाला जातो, काही लोकं…”; मुख्यमंत्र्यांचा संजय राऊतांना खोचक टोला
Eknath Shinde | कऱ्हाड : कऱ्हाडच्या शासकीय विश्रागृहाचे उद्घाटन आज झाले. त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज कऱ्हाडला आले होते. त्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊतांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं आहे.
“ज्यांच्या स्वत:वर विश्वास नाही, अशी माणसं जोतिषांकडे, मात्रिकांकडे जात असतात, अघोरी विद्यांचा आधार घेत असतात. जे अशा अघोरी विद्यांचा आधार घेतात, त्यांचा अंतही अघोरी होईल, महाराष्ट्रातील जनताच त्यांचे भविष्य ठरविणार आहे,” असं संजय राऊत म्हणाले होते.
यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “हाताच्या रेषा बदलण्याची ताकद मनगटात असावी लागते. ते बळ बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी आम्हाला दिले आहे. ३० जुनला आम्ही ती ताकद दाखवली आहे. ते राज्याने, देशाने पाहिले आहे. त्यामुळे आमच्यावर बोलण्याचा कोणाला अधिकार नाही.”
पुढे ते म्हणाले, “आम्ही उघडपणे दर्शनाला जातो. त्यात काय बंदी आहे. काही लोक लपुन छपुन जातात, त्यांना विचारा आम्ही दिवसाढवळ्या जातो. आम्ही गेलो त्यावेळी पत्रकार तेथे होते.” संजय राऊत फार महान नेते आहेत. त्यांच्याबद्दल मी काय बोलु. हात दाखवण्याची आवश्यकता मला नाही”, असं म्हणत त्यांनी संजय राऊतांना चिमटा काढलाय.
महत्वाच्या बातम्या :
- Amol Mitkari | “तुका म्हणे तोचि वेडा, त्याचे हाणूनी थोबाड फोडा”; रामदेव बाबांच्या विधानावर अमोल मिटकरी आक्रमक
- Skin Care Tips | पार्लरमध्ये न जाता ग्लोइंग स्किन हवी असेल तर, करा ‘या’ आयुर्वेदिक पद्धती फॉलो
- Health Tips | ब्रश न करता पाणी पिणे आहे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या!
- Vinayak Raut | “फडणवीस हे रंग बदलणारी राजकीय औलाद”; विनायक राऊतांचा हल्लाबोल
- Rohit Sharma | रोहित शर्माच्या ऐवजी ‘हे’ खेळाडू बनू शकतात भारताचे कसोटी कर्णधार
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.