Eknath Shinde | “इर्शाळवाडी दुर्दैवी घटनेत 12 जणांचा मृत्यू तर…”; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
Eknath Shinde | रायगड: रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावात काल (19 जुलै) रात्री अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या ठिकाणी दरड कोसळली (Irshalwadi Landslide) आहे.
या घटनेत गावातील 100 ते 200 लोक ढिगार्याखाली अडकल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर रायगड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळीच दाखल झाले आहे.
इर्शाळवाडी इथे झालेल्या दुर्दैवी घटनेमध्ये 103 लोकांना मातीच्या ढिगार्याखालून बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे.
आणखीन काही लोक मातीच्या ढीगार्याखाली असण्याची शक्यता बचाव पथकाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अजून बचाव कार्य सुरूच राहील असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटलं आहे.
12 people have unfortunately died in this incident
या घटनेला घडून साधारण 17 तास उलटून गेले आहे. आतापर्यंत या घटनेमध्ये 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
तर या घटनेमध्ये जखमी झालेल्या लोकांवर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे इत्यादी नेते देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रायगड जिल्ह्यात घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. या दुर्दैवी घटनेवर राज ठाकरे यांनी ट्विट करत खंत व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर त्यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रशासनावर खोचक टीका केली आहे. कुठे दरड कोसळू शकतात याचा अंदाज जर प्रशासनाला येत नसेल तर मग ते प्रशासन कसलं? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Aditya Thackeray | सरकारला ही दुर्घटना टाळता आली असती असं वाटतं का? इर्शाळवाडी घटनेवरून आदित्य ठाकरेंचा सवाल
- Raj Thackeray | कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? – राज ठाकरे
- Nana Patole | “विरोधात असताना छगन भुजबळांचा घसा कोरडा व्हायचा आणि आज…”; नाना पटोलेंचा छगन भुजबळांवर घातक वार
- Jitendra Awhad | मी घरं बांधून दिली तशी तुम्ही देणार का? इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर जितेंद्र आव्हाडांचा राज्य शासनाला खडा सवाल
- Ajit Pawar | जखमींवर सरकारी खर्चानं उपचार तर मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर अजित पवारांची घोषणा
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3DjRzsi
Comments are closed.