Eknath Shinde | एकनाथ शिंदेंनी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची घेतली भेट !

 Eknath Shinde | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना 31 ऑक्टोंबर रोजी ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.  ते तीन दिवस झाले ब्रीच कँडीत उपचार घेत आहेत. त्यांना भेटायला चक्क राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गेले होते. त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे (Eknath Shinde)

एकनाथ शिंदे यांनी पवारांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीबाबतही माहिती दिली आहे. भेट घेतल्यानंतर शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधाला. शरद पवार यांची प्रकृती चांगली आहे. शरद पवार यांनी माझ्याशी संवाद साधला. उद्या ते शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबीराला जाणार आहेत. त्यानंतर पुन्हा रुग्णालयात येऊन त्यांच्या काही टेस्ट करतील. परत त्यांना डिस्चार्ज मिळेल, असं शरद पवार यांनी सांगितलं, असल्याचं शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, दिवाळीत किमान 50 हजार लोकांना शरद पवार भेटले होते. लोकांना भेटल्यामुळे, बोलल्यामुळे संसर्ग झाला आहे. परंतु, त्यांची तब्येत ठीक असून, इच्छाशक्तीच्या बळावर ते लवकर बरे होतात. मोठ्या आजारांना त्यांनी हरवलं, न्यूमोनिया किरकोळ विषय आहे, अशी महिती माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

पुढे बोलताना टोपे म्हणाले की, न्यूमोनिया बद्दल रोजच्या रोज तपासणी केली जाते. त्यानुसार डॉक्टर सल्ला देत राहतात. शरद पवार यांना आराम करण्याची गरज आहे. परंतु, शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबीराला ते उपस्थित राहतील. त्यानंतर थोडा आराम करतील. परत आपल्या नियमीत कामाला लागतील, अशी आशा आहे. मला शरद पवारांनी कारखाना सुरु केला का? मोळी टाकली का?.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.