Eknath Shinde | एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार; ‘या’ बड्या नेत्याच्या दाव्यानं चर्चांना उधान

Eknath Shinde | नागपूर: राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. या घडामोडी सुरू असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार असल्याचा दावा एका बड्या काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

Will Eknath Shinde and Uddhav Thackeray come together

“उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या आमदारांवर अपात्रतेची वेळ येऊ देणार नाही. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहे आणि महाविकास आघाडी तुटणार आहे”, असा दावा काँग्रेसचे निलंबित नेते डॉ. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, “एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र आले तर कोणताही आमदार अपात्र ठरणार नाही. या दोन्ही नेत्याकडे हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वाटचालींना काहीच अर्थ नाही. कारण दोन्ही नेते एकत्र येतील आणि शिवसेना-भाजपसोबत जाईल.”

“सुप्रीम कोर्टाने अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. 16 अपात्र आमदारांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. अपात्रतेची ही कारवाई सहा वर्षांसाठी असणार आहे. यादरम्यान अनेकजण राजकारणातून बाधही होतील”, असही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3WuwsMG