Eknath Shinde | कसलं ट्विट आणि कसला भूकंप? मोदी-शिंदेंच्या भेटीचं कारण आलं समोर

Eknath Shinde | नवी दिल्ली: आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली.

एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात होते. तर मोदी-शिंदे यांची भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. मुख्यमंत्री शिंदे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

My family wanted to meet Prime Minister Narendra Modi – Eknath Shinde

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी (Eknath Shinde) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना ते म्हणाले, “माझ्या कुटुंबाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा होती. त्यामुळे आम्ही सर्वांनी त्यांची भेट घेतली.

मोदींना भेटून आम्हा सर्वांना समाधान वाटले. ही सदिच्छा भेट असली तरी मोदीजींनी आम्हाला भरपूर वेळ दिला आहे. यावेळी आम्ही राज्यात सुरू असलेले प्रकल्प आणि पावसाची परिस्थिती यावर चर्चा केली.”

पुढे बोलताना ते (Eknath Shinde) म्हणाले, “या भेटीदरम्यान आम्ही मेट्रो प्रकल्प, मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्प आदी विषयांवर चर्चा केली.

त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्या योजना आणि प्रकल्प सुरू झाले होते, ते पुन्हा एकदा आम्ही सुरू केले असल्याचं देखील मोदींना आम्ही सांगितलं आहे.”

राज्यातील योजना आणि प्रकल्पांना केंद्र सरकार पूर्णपणे पाठिंबा देईल असा आश्वासन नरेंद्र मोदींनी दिलं असल्याचं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितलं आहे.

“18 जुलै रोजी एनडीएच्या बैठकीला आम्ही दिल्लीत आलो होतो. मात्र, आज मी कुटुंबासह प्रधानमंत्री यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला आलो आहे. माझ्या वडिलांना प्रधानमंत्री यांची भेट घेऊन अत्यंत आनंद झाला आहे”, असही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/44E1IME

You might also like

Comments are closed.