Eknath Shinde | काय ती झाडी, काय ते डोंगार! एकनाथ शिंदे पुन्हा ५० आमदारांसोबत गुवाहाटीला, यंदा डाव काय?

Eknath Shinde | मुंबई : राज्यात काही महिन्यांपुर्वी महाविकास आघाडी सरकार (MVA) पायउतार झाली. यासाठी एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी येथे बसून सत्तानाट्य खेळं. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पुन्हा एकदा ५० आमदारांसोबत गुवाहाटीला जाणार आहेत. त्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

कामाख्या देवीवर मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी श्रद्धा आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे आपल्या आमदारांसह गुवाहाटीला मुक्कामी होते. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदे यांनी सर्व आमदारांना घेऊन कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. यावेळी देवीची पूजा करून शिंदे आमदारांना घेऊन गोव्यात आले आणि तिथून मुंबईत पोहोचले होते. आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला आमदारांना घेऊन जात आहे.

यादरम्यान, येत्या १५ नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री शिंदे आणि आपले सर्व 50 आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाऊन कामख्या देवीचे दर्शन घेणार आहे. अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये शिंदे गट आणि भाजपवर माघार घेण्याची नामुष्की आली. त्यातच आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक निवडणुकीसाठी आता शिंदे गटाने सावध सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व 50 आमदारांसहित गुवाहाटीला जाणार आहे.

दरम्यान, हिंदूंच्या 51 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कामाख्या देवीचं मंदिर हे भारतातलं एकमेव असं मंदिर आहे जिथं महिला त्यांच्या पाळीच्या काळातही (Women Periods) देवीचं दर्शन घेऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.