Eknath Shinde | “गुवाहाटीमध्ये जिथे सांगेल तिथे सह्या करत होतो, पण आता…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

Eknath Shinde | मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतच दोन गट पडले. सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं आणि भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाण्यात एका कार्यक्रमादरम्यान बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.

ते म्हणाले, “गुवाहाटीत असताना आमच्याकडे खूपच वेळ होता. त्यावेळी आमदार सांगत होते, तेथे सह्या करत होते. त्यामुळे आमदारांनी जास्त निधी मिळवून घेतला. तुमचे आमदार प्रताप सरनाईक निधी आणायला खूप हुशार आहेत. जेवढी कामं गेल्या काही वर्षात त्यांच्या मतदार संघात झाली आहेत, तितकी कोणत्याही मतदार संघात झाली नाहीत.”

सहा महिन्यात राज्यात मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विकासाची कामे सुरु केली. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, शिक्षक यांच्यासाठी महत्वाची कामे हाती घेतली. गेल्या अडीच वर्षाच्या काळात जे काही बंद झाले होते त्याला पुन्हा चालना दिली, असंही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितलं.

“आमचे सरकार बनले नसते तर राज्यात कोणतेही उत्सव पुन्हा सुरु झाले नसते. गोविंदा झाला नसता, गणपती आले नसते, अन् नवरात्र दिवाळी झाली नसती, कारण चीनमध्ये कोरोना सुरु झाला आहे”, असे सांगत शिंदे यांनी आधीच्या सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.