Eknath Shinde | घरी बसणाऱ्यांना जनता घरीच बसवते; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Eknath Shinde | नाशिक: आज (15 जुलै) नाशिक शहरामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी जनतेला संबोधित केलं आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना आम्हाला मोडीत काढायची आहे, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.

In the beginning it was me and Devendra Fadnavis – Eknath Shinde

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “सुरुवातीला मी आणि देवेंद्र फडणवीस दोघेच होतो. तेव्हा आम्ही ठरवलं की जनतेला कामासाठी चकरा मारायला लागता कामा नये. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना आम्हाला मोडीत काढायची आहे.

म्हणूनच शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आमच्या या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभताना दिसत आहे. गडचिरोली सारख्या जिल्ह्यात हजारो संख्येने लाभार्थी आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित होते.”

पुढे बोलताना ते (Eknath Shinde) म्हणाले, “सरकार लोकांच्या दारोदारी फिरते अशी टीका विरोधक करतात. मात्र, दरोदरी फिरून जनसामान्यांची काम करण्यासाठीच हे सर्वसामान्य सरकार स्थापन झालं आहे.

घरी बसून राहण्यासाठी सत्ता नसते. ही सत्ता लोकांच्या घराघरात जाऊन दारात जाऊन राबवण्यासाठी असते. घरी जे बसतात त्यांच्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही.”

“घरी बसणाऱ्यांबद्दल शरद पवारांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे. त्याचबरोबर घरात बसणाऱ्यांना जनता घरात बसवून टाकते आणि लोकांमधल्या कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी देते.

लोकांना भेटलं पाहिजे लोकांना समजून घेतलं पाहिजे अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे मांडायचे. त्यांचीच भूमिका घेऊन आम्ही शासन म्हणून पुढे नेत आहोत,” असही ते (Eknath Shinde) म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/44lAaeO

You might also like

Comments are closed.