Eknath Shinde | जुनी मैत्री की राजकीय खेळी?, शिंदे गटाकडून ठाकरे गटाला दिवाळीच्या शुभेच्छा

Eknath Shinde | मुंबई : राज्यभरात मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी केली जात आहे. तरी सुद्धा सणाच्या निमीत्त नेते काही टीका करायचे थांबेणा. अशातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नक्की जुन्हा मैत्रीमुळे शुभेच्छा दिल्या की यात काही राजकीय डाव असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिंदे गटाकडे ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी देखील जात आहे. मात्र, याच काळात नाशिकमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते यांची प्रवेशाची संख्या फार कमी होती, त्यामुळे दिवाळीची संधी जात असल्याची चर्चा आहे. शिंदे गटात असलेले मंत्री, आमदार आणि खासदार यांच्याकडून जुन्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे, त्यात शिंदे गटाकडे खेचण्याचा प्रयत्न एकूणच केला असावा, अशी शक्यता दर्शिवण्यात येत आहे.

दरम्यान, शिंदे गटाकडून नाशिकच्या ठाकरे गटाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत, त्यात चाचपणी केली जात असून यामागे मोठी राजकीय खेळी असल्याची चर्चा आहे. मात्र, नाशिकमधील राजकीय परिस्थिति पाहता शिंदे गटात मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्या व्यतिरिक्त फारसा कोणीही मोठा नेता शिंदे गटात गेला नाही.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.