Eknath Shinde | त्यांनी आधी त्यांचा पक्ष आणि राज्य सांभाळावं; मुख्यमंत्री शिंदेंचा केसीआर यांच्यावर घणाघात
Eknath Shinde | ठाणे: केसीआर यांच्या उपस्थितीमध्ये भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलत असताना केसीआर (KCR) यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. वीज कंपन्याचं खाजगीकरण का होतंय? शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय का घेता येत नाही? असे प्रश्न केसीआर यांनी उपस्थित केले होते. त्यांच्या या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
KCR should take care of his party first – Eknath Shinde
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “केसीआर यांनी आधी त्यांचा पक्ष सांभाळायला पाहिजे. तिकडे दिल्लीत त्यांचा पक्ष फुटत चालला आहे. त्यांनी त्यांचा पक्ष आणि राज्य सांभाळावा. त्यांनी त्यांच्या राज्यातील लोकांना सुविधा द्याव्या. महाराष्ट्राची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत.”
पुढे बोलताना ते (Eknath Shinde) म्हणाले, “गेल्या 11 महिन्यामध्ये आम्ही महाराष्ट्रातील जनतेला अनेक सुविधा पुरवल्या आहेत. त्याचबरोबर अनेक विकास कामं झाली आहेत. शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी आम्ही कामं केली आहेत.”
दरम्यान, बीआरएस पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाला आहे. या प्रकरणावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | त्यांनी आधी त्यांचा पक्ष आणि राज्य सांभाळावं; मुख्यमंत्री शिंदेंचा केसीआर यांच्यावर घणाघात
- Devendra Fadnavis | “त्यांनी जर तोंड काळ केलं नसतं तर…”; फडणवीसांचा एकनाथ खडसेंना खोचक टोला
- Shinde Group | ठाकरे गटाला रामराम ठोकत ‘हा’ नेता झाला शिंदे गटात सामील
- Chitra Wagh | अनिल परबांची “रस्सी जल गई, पर बल नही गया !” – चित्रा वाघ
- Jayant Patil | मुख्यमंत्र्यांच्या हुकूमशाहीला महाराष्ट्रात जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही – जयंत पाटील
Original NEWS SOURCE – https://bit.ly/43gpJbj
Comments are closed.