Eknath Shinde | “दादा तुम्ही आता शिवसेनेचं प्रवक्तेपद घेऊन टाका”; एकनाथ शिंदेंचा मिश्किल टोला
Eknath Shinde | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विधानसभेतील भाषणात पहाटेचा शपथविधी, महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाइव्ह, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स आदी विषयांवरून चौफेर फटकेबाजी केली. तर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर हास्य-विनोदातून निशाणा साधला आहे.
“दादा तुम्ही आता शिवसेनेचं प्रवक्तेपद घेऊन टाका”
एकनाथ शिंदे यांनी बोलता बोलता ‘पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मला किती धक्का बसला, तेही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर अजित पवार यांना धारेवर धरत “दादा तुम्ही आता शिवसेनेचं प्रवक्तेपद घेऊन टाका”, असा मिश्किल टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यामुळे मला धक्का बसला. राज्यपाल कोश्यारीही अवाक झाले. असा उल्लेख अजित पवार यांनी भाषणात केला. यावरून एकनाथ शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली आहे.
Eknath Shinde Comment on Ajit Pawar
“पहाटेच्या शपथविधी वेळी पण तुम्हीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मी सकाळी टीव्ही लावला तेव्हा मला वाटलं हे मागचं आहे. मग कुणीतरी बोललं हे मागचं नाही, आताचच आहे. जयंतरावांना फोन करत होतो. ते उचलत नव्हते. ते बोलले जयंतरावही तिथेच होते. तो माझ्यासाठी मोठा शॉक होता. त्यातल्या सुरसकथा हळू हळू बाहेर येत आहेत. त्या देवेंद्र फडणवीस यांनी अजून स्पष्ट केलेल्या नाहीत. त्यांनीही अर्धच सांगितलं आहे. ते जेव्हा पूर्ण सांगतील, तेव्हा सगळ्यांना मोठा शॉक बसेल”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
“आता सहशिवसेना प्रमुख पदही देता येणार नाही कारण…”
अजित पवार तर शिवसेनेचे प्रवक्ते झाल्यासारखेच बोलतात, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. एकनाथ शिंदे म्हणाले, “दादांना फक्त पदच द्यायचं बाकी आहे”. यावर फडणवीस म्हणाले, “सहशिवसेना प्रमुख” एकनाथ शिंदे यांनी लगेच पुढची टिप्पणी केली. आता सह शिवसेनाप्रमुखही होता येत नाही. कारण शिवसेना आपली आहे. तीही संधी गेली आहे”, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी अजितदादांना खोचक टोला लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- Ajit Pawar | “जाहिरात ‘योजना दमदार, जनतेचे हे सरकार’ अन् बस पार दळभद्री, अरे कशाला असले धंदे करता”
- Sanjay Raut | “शिवसेना काय तुमच्या बापाची आहे का भो***?”; संजय राऊतांची बोचरी टीका
- Eknath Shinde | “पोटनिवडणुकीत हरतात अन् आख्खं राज्य जिंकतात, हा भाजपचा इतिहास”
- Eknath Shinde | “आनंद घेऊ द्या, आनंद व्यक्त करू द्या…”; एकनाथ शिंदेंची कसबा निवडणुकीनंतरची प्रतिक्रिया
- Sushma Andhare | “त्यांच्यावर झालेला हल्ला निंदणीय…”; संदीप देशपांडेंच्या हल्ल्यानंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया
Comments are closed.