Eknath Shinde | “दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वतःच्या…”; शिंदे गटाचा ठाकरेंवर पलटवार 

Eknath Shinde | मुंबई : शिवसेना (Shivsena)  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात आज प्रजासत्ताक दिनानिमित्त दौऱ्यावर होते. मुख्यमंत्र्याच्या बालेकिल्ल्यात जाऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या आमदारांवर सडकून टीका केली.

“बिकाऊ होते ते विकले गेले, त्यांचा भाव सांगण्याची गरज नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत सवालही केला आहे. सचिन अहीरे, सुषमा अंधारे या ठाकरे गटात आल्या. मग त्या विकल्या गेल्या नाहीत का?, असा खोचक सवाल त्यांनी विचारला.

प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर सदस्य आहेत. त्या काँग्रेसमधून आलेल्या आहेत. सुषमा अंधारे या राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आलेल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक लोकं ते घेत आहेत. ते आपल्यात पुण्यकर्म म्हणून येत आहेत का?, असा सवाल नरेश म्हस्के यांनी केला.

उद्धव ठाकरेंचं वक्तव्य काय?

“80 टक्के समाजसेवा आणि 20 टक्के राजकारण ही शिवसेनेची शिकवण आहे. अस्सल निष्ठावंत सैनिक इथे आहे. बाकी काय भावाने विकले गेले ते तुम्हाला माहित आहेत. 50 खोके ही घोषणा काश्मीरपर्यंत पोहोचली आहे. संजय राऊत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत गेले होते. तिथेही 50 खोके या घोषणा दिसत होत्या. नाही म्हटलं तरी महाराष्ट्राची बदनामी आहे. जे गेले ते जाऊद्या. पण जे अस्सल शिवसैनिक शिवसेना आणि माझ्यासोबत राहिले. हे जे निखारे आहेत तेच उद्या मशाल पेटवणार आहेत. मी मुख्यमंत्री असताना विचित्र जबाबदारी आली होती, जागतिक संकट आले होते, त्यावेळी तुम्ही जे सहकार्य केले विशेषतः डॉक्टरांनी ते मोठं होतं”,  असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.