Eknath Shinde | “नाना पटोलेंसारखा स्वाभिमानी नेता बळजबरीने महामोर्चात सहभागी”; शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा दावा 

Eknath Shinde | मुंबई : भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाविकास आघाडीने राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आज महामोर्चाचं आयोजन केलं आहे. क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडिया इमारतीपर्यंत महाविकास आघाडीचा मोर्चा आयोजित करण्यात आलंय. या मोर्चावर एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) यांनी जोरदार टीका केली आहे.

ते म्हणाले, “राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या तिन्ही पक्षांनी मोर्चा काढला असला तरी, त्यांची मतं मात्र वेगळी आहेत. त्यांच्यात मतभेद आहेत. नाना पटोलेंसारखा निष्ठावंत, स्वाभिमानी नेता बळजबरीने महामोर्चामध्ये सहभागी झाले आहेत.

“अनेक लोक मोर्चापासुन पळवाट काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना या मोर्चात सहभागी व्हायचं नव्हतं. पण त्यांना जबरदस्तीने आणलं गेलं आहे, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले, “संजय राऊत स्वतःला स्टार प्रचारक समजतात. ते मोर्च्याला चालले नाहीत तर शूटिंगला चालले आहेत. कॅमेरा आपल्यावर कसा असावा आणि मी मोर्चामध्ये जाण्यासाठी घरातून मेकअप करून निघाले आहेत. संजय राऊत यांनी बेताल व्यक्तव्य केली. त्यांच्याबद्दल बोलायची आम्हाला लाज वाटत आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्र द्रोह्यांविरोधात आज जनता एकवटली आहे. लाखोंच्या संख्येने आंदोलक महामोर्चात सहभागी झाले आहेत. या एकजुटीनं महाराष्ट्रातील सरकारच नाही तर त्यांना अभय देणारं केंद्रातलं सरकारच उलथून टाकू, असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.