Eknath Shinde | “फ्रिजच काय कंटेनरमधले खोके…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

Eknath Shinde | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गुवाहाटी (Guwahati) दौऱ्यावर आहेत. आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहटीमध्ये जात कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. यावेळी कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर शिंदेंनी खोक्यांच्या मुद्यावर प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना गंभीर इशारा दिला आहे.

यावेळी खोक्यांच्या मुद्याबाबत बोलताना, आमदारांच्या छोट्या-मोठ्या खोक्यांबद्दल काय बोलता? फ्रिजमधून खोके कुठे गेले, कंटेनरमधले खोके कुणाकडे जाऊ शकतात, हे समोर येईल. काल केसरकर यांनी सूचक विधान केलेलं आहेच. आता सगळ्या दुनियेला माहिती होईल, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

कामाख्या देवीचं मनोभावे दर्शन घेतलं. सगळ्यांना समाधान आणि आनंद वाटला. काल आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आमचं जंगी स्वागत केलं. त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारीही सोबत होते. जिथे आम्ही थांबलो तिथे मुख्यमंत्रीही आले होते. त्यांनी स्नेहभोजन दिलं असल्याचं देखील शिंदेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.