Eknath Shinde | “बंडावेळी आमचे मोबाईल काढून घेतले होते अन्…”; मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट

Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वर्षापूर्ती झाली आहे. एका वर्षानंतर याबाबत अनेक खळबळजनक खुलासे होत आहेत. अशात एका बड्या नेत्यांनं मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Mobiles of MLAs were taken away during the rebellion – Ravindra Chavan

सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी मोठा खुलासा केला आहे. रवींद्र चव्हाण म्हणाले, “बंडावेळी आमदारांचे मोबाईल काढून घेण्यात आले होते. त्याचबरोबर त्यावेळी आम्हाला टीव्ही देखील बघू दिला नव्हता. गुवाहाटीला पोहोचल्यानंतर आम्हाला घरच्यांसोबत संपर्क साधण्याची परवानगी दिली आणि टीव्ही बघायला दिला. कारण या मिशनमध्ये (Eknath Shinde) थोडी जरी चूक झाली असती तरी हे मिशन यशस्वी झाले नसते.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन लोटस (Eknath Shinde) करण्याचा प्रयत्न तीन वेळा दिल्लीतील नेत्यांनी केला आहे. मात्र, काही कारणांमुळे ते होऊ शकले नाही. मात्र, जून 2022 मध्ये राबविण्यात आलेले ऑपरेशन लोटस यशस्वी झाले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नियोजनानुसार हे ऑपरेशन पार पडले.

“महाविकास आघाडीतील 20 आमदार आमच्या सोबत यायला तयार होते. मात्र, त्यांना आमच्या सोबत येता आले नाही. सध्या ते महाविकास आघाडीमध्ये असले तरी ते मनाने शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार सोबत आहे”, असंही ते म्हणाले. रवींद्र चव्हाण यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://maharashtradesha.com/ravindra-chavan-disclosure-about-the-eknath-shinde-rebellion/?feed_id=45225