Eknath Shinde | सातारा: सुप्रीम कोर्टाने सत्ता संघर्षाचा निकाल दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा जाहीर सभा घेतली. सातारा दौऱ्या दरम्यान झालेल्या सभेमध्ये त्यांनी ठाकरे गटावर सडकवून टीका केली आहे. घटनाबाह्य बोलणाऱ्यांना कोर्टाने कालबाह्य केलं आहे, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र चालवलं आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, “मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. त्याचबरोबर हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणार आहे. गोरगरिबांना न्याय देणे हेच सरकारचं काम आहे. घटनाबाह्य बोलणाऱ्यांना कोर्टाने कालबाह्य केलं आहे.”
कर्नाटक निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदे म्हणाले, “कुणाला कशात आनंद वाटतो कळतच नाही. दुसऱ्यांच घर जळताना काही लोक आनंद व्यक्त करतात. मात्र स्वतःच घर जळालं आहे ते आधी वाचवावं”, असा अप्रत्यक्ष टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. “बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता टोला लागला आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे (What did Uddhav Thackeray say?)
कर्नाटक निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “कर्नाटकमध्ये भाजपला नाकारण्यात आलं आहे. भाजपचा फोडाफोडीचं राजकारण कर्नाटकमधल्या लोकांना आवडलेलं नाही. कर्नाटकनंतर भाजपला आता आम्ही महाराष्ट्रातून घालवणार आहोत.”
महत्वाच्या बातम्या
- Karnataka Election Result | कर्नाटक निवडणूक निकालावरून सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस! पाहा लोकांची क्रिएटिव्हिटी
- Karnataka Election Results । कर्नाटकातील काँग्रेसच्या दमदार विजयावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
- Karnataka Election Result | कानडी जनतेनं मोदी- शाहांचं ऐकलं नाही- संजय राऊत
- Prithviraj Chavan | “भाजप पराभव सहन करणार नाही…” ; पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली भीती
- Karnataka Election Result | “कर्नाटकमध्येही फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता…”; कर्नाटक निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया