Eknath Shinde | “मी सगळ्यांना कामाला लावलं”, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरुन मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी

Eknath Shinde | नंदुरबार : परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मराठवाडा (Marathwada) दौरा केला. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना ‘संकटांशी आपल्याला लढायचं आहे. त्यामुळे धीर सोडू नका. सरकारला मदत करण्यासाठी आपण भाग पाडू’, असं आश्वासन दिले. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्ला केला आहे. मी सगळ्यांना कामाला लावलं, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे (Eknath Shinde)

काही लोक बांधावर जातात, ठीक आहे गेले पाहिजेत. शेवटी काम तर करायलाच पाहिजे. सरकारमध्ये असलेल्यांनी आणि बाकी लोकांनी पण, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून वार केला आहे. नंदुरबारमध्ये नंदुरबार नगरपरिषद इमारतीच्या लोकार्पण सोहळा पार पडला. त्याठिकाणी एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना शिंदेंनी नंदुरबारचा रखडलेला सात कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला आहे.

तसेच, जून, जुलै, ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदतीचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच हजार कोटी जमा करण्यात आले आहेत. ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानाच्या पंचनाम्याचेही आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचं प्रोत्साहन अनुदान सरकारकडून देण्यात येत आहे.

त्याचबरोबर शिंदे-फडणीस सरकारने  तीन महिन्यात 72 निर्णय घेतल्याचं सांगताना 400 जीआर काढल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.