Eknath Shinde | योगाच्या माध्यमातून मोदींनी जगाला आरोग्याची गुरुकिल्ली दिली – एकनाथ शिंदे
Eknath Shinde | मुंबई: आज (21 जुन) जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) साजरा केला जात आहे. योग दिनाच्या निमित्त्यानं गेटवे ऑफ इंडिया येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Narendra Modi has given the key to health through yoga – Eknath Shinde
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सुरू केली आहे. योगाच्या माध्यमातून मोदींनी जगाला आरोग्याची गुरुकिल्ली दिली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये योग ही काळाची गरज झाली आहे.”
पुढे बोलताना ते (Eknath Shinde) म्हणाले, “आज राज्यात अनेक ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ही एक अत्यंत आनंदाची आणि कौतुकाची बाब आहे.” “योग करा निरोगी रहा”, असंही ते यावेळी म्हणाले आहे.
दरम्यान, विधान भवन परिसरात देखील योग दिन साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमास रमेश बैस (Ramesh Bais), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी योगासनं केली.
महत्वाच्या बातम्या
- Sushma Andhare | आता त्यांचं सदस्यत्व रद्द होईल; सुषमा अंधारेंचा मनीषा कायंदेंवर पलटवार
- Sanjay Raut | मानसिक स्वास्थ्य ठीक नसलेल्या व्यक्तीच्या हातात राज्याचा कारभार – संजय राऊत
- Eknath Shinde | “बंडावेळी आमचे मोबाईल काढून घेतले होते अन्…”; मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट
- Narendra Modi | मी मोदींचा फॅन आहे; एलॉन मस्कने मोदींवर केला स्तुती स्तुमनांचा वर्षाव
- NCP | राष्ट्रवादीचा महत्वाचा नेता भाजपच्या वाटेवर; ‘पवारांनी राजीनामा दिला तेव्हा फक्त रडायचं नाटक…’
Original NEWS SOURCE – https://maharashtradesha.com/eknath-shinde-said-that-narendra-modi-gave-the-key-to-health-through-yoga/?feed_id=45267
Comments are closed.