Eknath Shinde | राज्याच्या राजकारणात येणार नवीन भूकंप? CM शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर

Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. त्या दिवसानंतर राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल? याबाबत अंदाज बांधनं अशक्य झालं आहे.

अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री शिंदे सहकुटुंब दिल्लीत दाखल झाले आहेत.

Eknath Shinde has suddenly left Mumbai for Delhi last night

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काल रात्री अचानक मुंबईहून दिल्लीला रवाना झाले आहे. मुख्यमंत्र्यांचा हा नियोजित दौरा नसून ते कुटुंबासह वैयक्तिक कामासाठी त्या ठिकाणी गेले असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर ते या दौऱ्यादरम्यान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याच्या चर्चा देखील सुरू आहे.

दरम्यान, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर ते राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरू आहे. तर आज अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात जागोजागी भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे पोस्टर लावण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.

18 जुलै 2023 रोजी दिल्लीमध्ये सत्ताधाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.

त्या बैठकीनंतर आज परत मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत गेल्याने उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार का? अशा चर्चा देखील सुरू झाल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3KabyOd

You might also like

Comments are closed.