Eknath Shinde | राज्यातील तिसरा मोठा प्रकल्प गुजरातला गेला अन् एकनाथ शिंदे म्हणतात…

Eknath Shinde | मुंबई : राज्यात मोठा मानला जाणारा ‘टाटा एअर बस’चा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. त्यामुळे आता राज्यात वातावरण प्रचंड तापलेलं आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात हवेत उडणाऱ्या बसचा हा प्रकल्प होता.

राज्यातील मोठ्या उद्योगाबाबत मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मोदी आणि शहा यांच्यासोबत चर्चा केली असल्याचं शिंदेंनी नंदुरबार येथे म्हटलं आहे. तसेच राज्यात भविष्यात मोठे मोठे उद्योग येतील. राज्याची भरभराट होईल. राज्याची समृद्धी होईल. भविष्यात तरुणांच्या हाताला रोजगार मिळवण्यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील असेल असंही शिंदे म्हणालेत.

वेदांता – फॉक्सकॉन या मोठ्या प्रकल्पानंतर C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल् महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. IAF सौद्यांतर्गत महाराष्ट्रात सुरू होणारा टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमधील वडोदरा येथे स्थलांतरित झाला आहे. हा प्रकल्प नागपूर येथे होणार होता. नितीन गडकरी आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील याबाबत सांगितले होते. मात्र अचानक हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला.

शिंदे-फडणवीस सरकार हे प्रकल्प तत्कालीन सराकमुळे गेल्याचा आरोप करत आहे. मग तीन महिने झाले हे सरकार गोट्या खेळण्यात व्यस्त होते का?. प्रकल्प गुजरातलाचं का जात आहेत. या भारत देशात दुसरे राज्य नाही का? गुजरात निवडणूक आली तर महाराष्ट्राला उपाशी ठेवून शिंदे-फडणवीस सरकार गुजरात्यांचे पोट भरत आहे का?, असे प्रश्न महाराष्ट्रातील नागरिक उपस्थित करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.