Eknath Shinde | ‘वर्षा’वर लागली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची ‘नेमप्लेट’

मुंबई : मुख्यमंत्री म्हंटल कि पहिला शब्द आठवतो तो म्हणजे ‘वर्षा’… वर्षा बांगला- म्हणजेच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ निवासस्थान सोडल्यापासून हा बांगला रिकामाच आहे, कारण सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजूनही तिथे राहायला गेले नाहीत. मात्र आजच वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. त्यामुळेच येत्या काही दिवसात शिंदे वर्षा निवासस्थानी राहायला जाण्याची शक्यता आहे.

2014 पासून एकनाथ शिंदे हे मलबार हिल येथील ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानात राहत आहेत. पण मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतरही त्यांनी नंदनवन सोडले नव्हते. त्यामुळे वर्षा बांगला हा मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत होता. मुख्यमंत्री शिंदे हे वर्षावर गेले नसल्याचं एक कारणही समोर येत आहे. ते कारण आहे बंगल्याची डागडुजी. गेल्या काही दिवसांपासून वर्षा बंगल्याची डागडुजी आणि रंगकाम सुरु होत. ते आता पूर्ण झालं आहे. त्यामुळेच आता या बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लागली आहे. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री इथे राहायला जातील अशी अपेक्षा आहे.

विरोधी पक्षनेते राहणार उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी
राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री असताना ज्या बंगल्यात राहत होते तिथेच ते आताही राहणार आहेत. मलबार हिल येथील ‘देवगिरी’ बंगला हा सहसा उपमुख्यमंत्री किंवा ज्येष्ठ मंत्र्याला दिला जातो. ठाकरे सरकार सत्तेत असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे याच बंगल्यात राहत होते. दरम्यान सत्ता बदल झाल्यानंतर हा बंगला सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळणार होता. मात्र हा बंगला पुन्हा आपल्यालाच मिळावा, अशी मागणी अजित पवारांनी केली होती. त्यांची हि मागणी मान्य करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.