Eknath Shinde | विक्रम गोखलेंच्या जाण्याने भारतीय रंगभूमी व चित्रपट क्षेत्राचे नुकसान – एकनाथ शिंदे

Eknath Shinde | पुणे : हम दिल दे चुके सनम आणि भूल भुलैया यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे, बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) गेल्या पंधरा दिवसापासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीही मिळत होती.

अशा परिस्थितीत बुधवार संध्याकाळपासून दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत होत्या. पण नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी वयाच्या 77 व्या वर्षी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आपले अखेरचे श्वास मोजले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी फेसबूक पोस्ट शेअर करत विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“आपल्या चतुरस्त्र अभिनयाच्या दैवी देणगीने मराठी तसेच हिंदी रंगभूमी तसेच चित्रपट सृष्टीत आणि रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय रंगभूमी व चित्रपट क्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. आम्ही गोखले कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली”, अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.

अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) हे नाव डोळ्यासमोर येताच त्यांनी केलेले बॉलीवूडमधील अगणित पात्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. त्यांनी संजय लीला भन्सालीच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटामध्ये ऐश्वर्या रायच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर त्यांनी बॉलीवूडमधील सुपरहिट भुलभुलय्या, दिल से, दे दनादन, हिचकी, मिशन मंगल यासारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला होता. विक्रम गोखले यांनी मराठी चित्रपटासोबतच हिंदी चित्रपटांमध्ये ही भरपूर काम केलं आहे.

 महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.