Eknath Shinde | “विरोधकांना त्यांचा एक नेता ठरवता…”; दिल्लीत पोहोचताच मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांचे कान टोचले

Eknath Shinde | नवी दिल्ली: एकीकडं कर्नाटकच्या बंगळुरू शहरामध्ये आज विरोधकांची बैठक सुरू आहे. तर दुसरीकडं सत्ताधारी पक्षानं दिल्लीत बैठक बोलावली आहे.

सत्ताधाऱ्यांच्या या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील दिल्लीत दाखल झाले आहे. दिल्लीत पोहोचताच एकनाथ शिंदे यांनी देशभरातील विरोधकांवर टीका केली आहे.

माध्यमांशी बोलत असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “एनडीए या बैठकीमध्ये तब्बल 38 घटकपक्ष सहभागी होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2024 मध्ये एनडीएलाच बहुमत मिळेल. अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर एनडीए मजबूत झाल्याचं दिसलं आहे.”

The opposition is not able to decide a leader – Eknath Shinde

पुढे बोलताना ते (Eknath Shinde) म्हणाले, “देशात एकीकडे एक विचारधारा असलेलं महासंघटन आहे. तर दुसरीकडे विरोधकांना एक नेता ठरवता येत नाहीये.

एवढे सगळे लोक एकत्र आले आहेत तरी त्यांना एक नेता ठरवता येत नाहीये. विरोधकांमध्ये कोणत्याही प्रकारचं एक मत नाही. इथंच नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा विजय झाला आहे.”

“50-60 वर्षांमध्ये काँग्रेसला जी कामं जमली नाही ती कामं मोदी सरकारनं 09 वर्षात करून दाखवली आहे. मोदी सरकारनं देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था 10 वरून पाचव्या क्रमांकावर आली आहे. नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगात भारताचं नाव आदरानं घेतलं जातं”, असंही ते (Eknath Shinde)  यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3OixjxF