Eknath Shinde | शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरणार? राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाची नोटीस
Eknath Shinde | नवी दिल्ली: एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर लवकरात लवकर सुनावणी व्हावी, यासाठी ठाकरे गटांनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना सुप्रीम कोर्टानं नोटीस पाठवली आहे.
Sunil Prabhu had filed a petition in the Supreme Court
11 मे रोजी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागला होता. यामध्ये सुप्रीम कोर्टानं 16 आमदारांच्या (Eknath Shinde) अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला होता. मात्र, अद्यापही आमदारांच्या अपात्रतेबाबत कारवाई झाली नाही. त्यामुळं ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
16 आमदारांच्या (Eknath Shinde) निलंबनाबाबत विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेची आज सुनावणी झाली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठांसमोर ही सुनावणी पार पडली.
या खंडपीठात न्यायमूर्ती सिम्हा आणि न्या. मिश्ना यांचा समावेश होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दोन आठवड्यात लेखी उत्तर द्यावं, अशी नोटीस सुप्रीम कोर्टानं नार्वेकरांना बजावली आहे.
दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट (Eknath Shinde) आणि ठाकरे गटातील आमदारांना नोटीस पाठवली होती. या नोटीसचं उत्तर देण्यासाठी नार्वेकरांनी आमदारांना 07 दिवसांचा वेळ दिला होता. परंतु शिंदे गटातील आमदारांनी उत्तर देण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Balasaheb Thorat | “काहीतरी शिजत आहे, याचा वास…”; अजित पवारांच्या बंडखोरीवर बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान
- Nitesh Rane | आमच्या कोकणात मिटकरी सारख्या लोकांना शिमग्यातला गोमू म्हणतात – नितेश राणे
- Uddhav Thackeray | ठाकरे-शिंदे पुन्हा येणार आमने-सामने! एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा मेळावा
- Rohit Pawar | महिलांची सुरक्षा करता येत नसेल तर सरकारला क्षणभरही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही – रोहित पवार
- Sanjay Raut | काल ठाण्यात दोन हास्यजत्रेचे शो पाहायला मिळाले; शिंदे-फडणवीसांच्या बैठकीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3JWTjvu
Comments are closed.