Eknath Shinde | शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याने आदित्य ठाकरेंची काढली उंची, वय आणि पात्रता

Eknath Shinde | मुंबई : मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट चॅलेंज केलं आहे. तुमच्यात हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले होते. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“मी लायकी म्हणणार नाही, पण योग्यता आणि पात्रता नसलेल्या तरीही कॅबिनेट मंत्री झालेल्या व्यक्तीने आपली उंची आणि वय याचं भान ठेवलं पाहिजे”, असं म्हणत नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

“त्यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी स्वत:ला शिवसेनेच्या कामात वाहून घेतलं आहे. त्यांच्यामागे शिवसनेनेला पाठिंबा देणारे ४० आणि सरकारला पाठिंबा देणारे १० आमदार आहेत. शिवाय १३ खासदार आणि लाखो शिवसैनिक आणि नगरसेवक त्यांच्या पाठिशी आहेत”, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.

आदित्य ठाकरेंची परिस्थिती शोले चित्रपटातील ‘जेलर’सारखी झाली आहे. आदित्य ठाकरेंना वरळीतून निवडून आणण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले आहेत किंवा किती सेटलमेंट कराव्या लागल्या आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, अशी जहरी टीका नरेश म्हस्के यांनी केलीय.

Aditya Thackeray challenge to Eknath Shinde

“मी वरळीतून राजीनामा देतो. घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन माझ्यासमोर वरळीतून उभे राहावे. निवडून कसे येतात ते मी बघतोच. जी काही यंत्रणा लावायची ती लावा. जी काही ताकद लावायची ती लावा. जेवढे काही खोके वाटायचे ते वाटा पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही. एकही शिवसैनिक विकला जाणार नाही. त्यांना पाडणारच” असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या :