Eknath Shinde | शिंदे गटातील ‘या’ आमदाराने केलं शरद पवारांचं कौतुक, राजकीय चर्चांना उधाण

Eknath Shinde | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील नेते चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचं कौतुक केलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. जळगावातील पारोळा येथे भाजप आणि शिंदे गटाच्या प्रचार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाटील यांनी विधान केले आहेत.

यावेळी, जिल्हा दूध संघाच्या जास्तीच्या या दुधाला राज्यात मागणी नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. या अडचणीवर मात करण्यासाठी आम्ही रेल्वे द्वारे कलकत्ता येथे दूध पाठविण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय दूध संघासाठी खूपच फायदेशीर ठरला होता, असं पाटील म्हणाले.

दुध संघ चांगला नफ्यात तर आलाच शिवाय रेल्वेद्वारे पहिल्यांदा इतर राज्यात दूध पाठविणारा जळगाव दूध संघ हा देशात पहिला ठरला होता. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्याची दखल घेत त्यांच्या मंत्री मंडळातील दुग्धविकास मंत्री मधुकरराव पिचड यांना निमंत्रण नसतांना जिल्हा दूध संघाच्या शुभारंभसाठी पाठविले होते, असं चिमणराव पाटील यांनी म्हटलं आहे.

यादरम्यान, शरद पवार यांची ही दूरदृष्टी आपल्याला आवडली असल्याचं आमदार चिमणराव पाटील यांनी मेळाव्यात बोलताना सांगितलं. राजकारणात आपण एका ठराविक मर्यादेपर्यंत राजकीय विरोध करायला हवा आणि चांगल्याला चांगलं म्हटल पाहिजे असं आपल्याला वाटतं, असंही आमदार चिमणराव पाटील म्हणाले. आजच्या काळात नेते एकमेकांवर टीका करतांना खालची पातळी गाठत असल्याचे पहायला मिळत आहे. राजकारणातील विरोध आता एकमेकांच्या कुटुंबापर्यंत जावून पोहचला आहे, असं कौतुक पाटलांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.