Eknath Shinde | ‘शिंदे गट’ भाजपमध्ये जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

Eknath Shinde | मुंबई :  एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारसोबत घेत भाजप पक्षासोबत युती करत राज्यात सरकार स्थापन केलं आहे. असं असतानाच शिंदे गट भाजप (BJP) पक्षामध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच याच संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे (Eknath Shinde)

तुम्ही भाजपमध्ये जाणार असं म्हटलं जात होतं?, असा सवाल एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, ते केवळ म्हणत होते ना. ते तर असंही म्हणत होते की भाजपचा मुख्यमंत्री होणार. कुठे झाला भाजपचा मुख्यमंत्री?. काल (शुक्रवार) मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’मध्ये सहभागी झाले होते, त्यावेळी शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.आमच्याबद्दल काय काय म्हणत होते त्यावेळेस, हे होणार, ते होणार. आम्ही लोक बाळासाहेबांची विचारसणी पुढे नेत आहोत. आम्ही बिलकूल मागे हटलो नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

तसेच, शिवसेना पक्षावर अजूनही शिंदे गट आपला दावा सांगत आहे. यावरून त्यांना पत्रकारांनी अजूनही तुमचा पक्षावर, धनुष्यबाणावर दावा आहे?, असा सवाल करण्यात केला. त्यावर ते म्हणाले, प्रश्नच नाही. आम्ही दुसरीकडे गेलेलोच नाही. आम्हीच पक्ष आहोत. देशाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच झालं असेल की पक्षाच्या अध्यक्षांना पक्षातून काढून टाकलं आणि लोक आम्हीच पक्ष असल्याचं म्हणत आहेत. आम्हीच बाळासाहेबांबरोबर काम करुन पक्ष वाढवला आहे. हा पक्ष मोठा करण्यामध्ये सर्वांचीच मेहनत आहे.

पुढे बोलताना शिंदेंनी असंही म्हटलं की, बाळासाहेब ठाकरेंची विचारसणी आम्ही सोडलेले नाही. लोकांना हवं होतं ते आम्ही केलं आहे. आज आम्ही जिथे जिथे जातो तिथे हजारोंच्या संख्येने लोक जमतात. चला सभांना तरी लोक गाड्यांमधून आणतो म्हटलं तरी रस्त्यावर जमणाऱ्या गर्दीचं काय? हजारोंच्या संख्येनं लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे असतात. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बरंच काही सांगून जातात. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray), आनंद दिघेंचे (Aanand Dighe) विचार हाच आमच्यासाठी ऑक्सिजन असल्याचंही शिंदे यांनी म्हटलं.
महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.