Eknath Shinde | शिंदे सरकारचा झटका! विजेचं बिल २०० रुपयाने महागणार

Eknath Shinde | मुंबई : वाढत्या महागाईच्या काळात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नवीन झटका देणार आहेत. शिंदे सरकारने विज बिल (Light Bill) मध्ये दर वाढची घोषणा करण्याची शक्यता आहे. किमान 60 पैसे प्रति युनिट वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्याचे वीज बिल किमान 200 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

वीज खरेदी खर्चातील वाढीपोटी महावितरणने 1500 कोटी रुपये राखीव ठेवले होते. तो निधी 2021 मध्येच संपला आहे. त्यामुळे महावितरणने 1 एप्रिल 2022 मध्ये खरेदीच्या वाढीपोटी इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली.

महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता शिंदे सरकारपुन्हा एकदा झटका देणार आहे. राज्यात विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने आधीच घेतला आहे. आता नोव्हेंबर महिन्यात पुन्हा दरवाढ होणार आहे.

पुढील महिन्यात महावितरण 60 ते 70 पैशांची वाढ करणार आहे. त्यामुळे इंधन शुल्कचा दर हा 2 रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.वीज खरेदीपोटी महावितरणला जवळपास ४० हजार कोटी रुपयांची वसुली गरजेची आहे. त्यामुळे वीज दरवाढ केली जाणार आहे. राज्यात महानिर्मिती 7 औष्णिक वीज प्रकल्पांमधून 30 संचांद्वारे वीजनिर्मिती करत असते.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.