Eknath Shinde | “संजय राऊतांसारखी लोकं एकनाथ शिंदेंनी दिलेल्या तुकड्यावर…”; शिंदे गटाच्या आमदाराचा खुलासा

Eknath Shinde | मुंबई: राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सतत आरोप प्रत्यारोप करत असतात. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र चालवलं आहे. राज्य सरकार खंडणीखोर सरकार असून त्यांनी पैसे गोळा करण्यासाठी अनेक एजंट नेमले आहे, असा आरोप संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या आमदारांनी राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मोठा खुलासा केला आहे. “एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी मातोश्रीवर पैसे दिले आहे. संजय राऊतांसारखी लोकं एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पैशांवर मोठे झाले आहे. मुख्यमंत्री शिंदे पैसे वसूल करणारे नेते नाही तर ते दोन्ही हाताने दान देणारे नेते आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी दिलेले पैशावर ठाकरे गटाच्या दुकानदाऱ्या सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या तुकड्यावर तुम्ही मोठे झाले आहात. शिंदेंनी आतापर्यंत मातोश्रीवर किती पैसे दिले आहे, हे त्यांनाच माहीत नसेल आणि आता तुम्ही त्यांना नाव ठेवता. मुख्यमंत्री शिंदे एक उदार माणूस आहे.”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर शंभर टक्के पैसे दिले आहे आणि यामध्ये काहीही नवीन नाही. मुख्यमंत्र्यासह अनेक नेत्यांनी मातोश्रीवर पैसे पाठवले आहे”, असंही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/41HAxyg

You might also like

Comments are closed.