Eknath Shinde | “सत्ताधारी असो वा विरोधी पक्षाचा नेता सर्वांनी…”; इर्शाळवाडी घटनेवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

Eknath Shinde | मुंबई: 19 जुलै 2023 रोजी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दुर्दैवी घटना घडली आहे. या ठिकाणी पावसामुळे दरड कोसळून (Irshalgad Landslide) अख्खी वस्ती मातीखाली दबली आहे.

या घटनेनंतर संपूर्ण राज्य सुन्न झालं आहे. इर्शाळवाडीत अजूनही बचावकार्य सुरू आहे. या घटनेवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात प्रतिक्रिया दिली आहे.

In Irshalwadi, a crack occurred during the night – Eknath Shinde

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “इर्शाळवाडी येथे रात्रीच्या सुमारास दरड कोसळली. ही घटना घडल्यानंतर तातडीने त्या ठिकाणी NDR च्या चार टीम पोहोचल्या.

त्यानंतर मी, उदय सामंत, दादा भुसे आणि गिरीश महाजन तात्काळ रात्री तिकडे जायला निघालो. पहाटे सकाळी 03 च्या सुमारास आम्ही घटनास्थळी पोहोचलो.”

पुढे बोलताना ते (Eknath Shinde) म्हणाले, “सतत पाऊस सुरू असल्यामुळे घटनास्थळी आम्हाला यंत्र पोहोचवता आले नाही. त्यामुळे गावातील लोकांची शाळेत व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी 50 ते 60 कंटेनर मागवण्यात आले होते.

सध्या त्या ठिकाणी 30 कंटेनर उपलब्ध असून ते काम करत आहेत. त्याचबरोबर निर्वासित झालेल्या लोकांची कायमची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कामाला देखील लागले आहे.

“रायगड जिल्ह्यात घडलेल्या या दुर्घटनेमध्ये सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षाचे नेते असो, सर्वांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. माणुसकी काय असते हे सर्वांनी या घटनेदरम्यान दाखवून दिलं आहे”, असेही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/44YmGFT