Eknath Shinde | सरकारचा मोठा निर्णय ! वर्षातून किमान 4 आठवडे मराठी चित्रपट दाखवण्याची चित्रपटगृहांना सक्ती

Eknath Shinde | मुंबई :  गेल्या अनेक दिवसांपासून मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याच्या तक्रारी वारंवार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक निर्मात्यांना आपले चित्रपट दर्जेदार असूनही स्क्रीन्स न मिळाल्याने प्रदर्शित करता येत नाहीत. तर आता राज्य सरकारने मराठी चित्रपट व्यवसायाला दिलासा देणारा महत्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar) यांनी ट्विट करत दिली आहे.

आज ( 17 मे) सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विट करत सांगितलं की, मराठी चित्रपटांना सिनेमागृह तथा प्राईम टाईम उपलब्ध करुन देणेबाबत आज मंत्रालयात बैठक पार पडली. एखाद्या चित्रपटगृह धारकाने मराठी चित्रपट जर वर्षातून चार आठवडे न दाखवल्यास त्यास परवाना नूतनिकरणाच्या वेळी 10 लक्ष रु. दंड आकारण्यात येईल. असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या बैठकीला गृह विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव विद्या वाघमारे, मराठी सिनेमांचे निर्माते, दिग्दर्शक तसचं सिनेमागृहांचे मालक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. याचप्रमाणे सिंगल स्क्रीन चित्रपट गृहामध्ये भाडे वाढवू नका असाही निर्णय घेण्यात आला. यामुळे आता मराठी रसिक प्रेक्षकांना मराठी चित्रपटांचा आनंद लुटता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

 
Original news – https://bit.ly/3pNOyNw