Eknath Shinde | “सिल्वर ओकचे तुम्ही दलाल”; राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांचा पलटवार

Eknath Shinde | मुंबई : ठाकरे गटाच्या ११ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थित हा प्रवेश सोहळा पार पडला असून त्याकरिता पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे यांचीही उपस्थिती यावेळी होती. याच प्रवेशावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटात गेलेले सर्व दलाल असल्याचे म्हंटले आहे.

संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात गेलेल्या अजय बोरसे यांनी राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले, “आम्हाला एक व्यक्ती दलाल म्हंटली, ते नाशिकला पर्यटनासाठी येतात, शिवसेना पक्षाचे वाटोळं तुम्ही केलं आणि सिल्वर ओक चे तुम्ही दलाल आहात.”

“आम्हाला जास्त बोलायचे नाही, आमच्यावर बोलाल तर आम्हीही बोलू”, अशा शब्दात अजय बोरस्ते यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. याशिवाय नाशिकचा विकास खुंटला होता, मात्र चार महिन्यांपासून आम्ही बारकाईने बघत होती अत्यंत संवेदनशील असलेले मुख्यमंत्री आम्हाला लाभले आहे. नाशिकच्या विकासासाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचे बोरस्ते यांनी म्हंटले आहे.

संजय राऊत यांचं वक्तव्य काय?

महाराष्ट्रातून जी काही लोकं शिंदे गटात सामील झाली आहेत, एकतर ती दलाल आहेत. दोन नंबरचे त्यांचे धंदे आहेत. तसेच लालच दाखवून त्यांच्यावर दबाव आणून प्रवेश केले जात असल्याचे वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. या सगळ्यांचे दारु, जुगार, मटका असे धंदे आहेत. बनावट दारुचा व्यवसाय करणारे काही लोक आहेत. त्यांना कोणत्या पक्षाशी निष्ठा नसल्याचे राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.