Eknath Shinde | सीमाप्रश्नावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं; म्हणाले, “भुजबळांनी मार खाल्ला आणि त्यांच्यामुळे…”

Eknath Shinde | नागपूर :  विधिमंडळाचे हिवाळी अधिवशेन आजपासून सुरु झाले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेश बंदी केल्याचा मुद्दा सभागृहात आज उपस्थित केला. त्यांनी कर्नाटक सरकारच्या निर्णयांवर शिंदे-फडणवीस सरकारला सवाल केला. अजित पवार यांनी सीमावादाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांना प्रत्यत्तर दिलंय.

“सीमावासीयांसाठी भुजबळांनी मार खाल्ला आहे, त्यांच्यामुळे आम्हालाही मिळाला आहे. आम्ही जेल भोगले आहेत. त्यावेळी बोलणारे कुठे होते?,” असा खोचक सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. तसेच सीमावासीयांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे. बाळासाहेबांची हीच भूमिका होती, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

“अजित पवार यांनी मांडलेला मुद्दा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पण पहिल्यांदाच देशाच्या गृहमंत्र्यांनी याप्रकरणी हस्तेक्षप करत मध्यस्थी केली. मला वाटतं हे पहिल्यांदाच घडलं आहे. त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असल्याने त्यांनी बैठक घेतली”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “या प्रकरणात राजकारण करु नये. सीमावासियांच्या मागे उभे राहीले पाहीजे. राजकारण करायला खूप विषय आहेत. यापूर्वीच्या सरकारने मुख्यमंत्री धर्मादाय निधीचे पैसे बंद केले होते. योजना बंद केल्या. आम्ही सरकार आल्यानंतर पहिले त्या योजना सुरु केल्या. आम्हाला यात राजकारण करायचे नाही. सीमावासीय ठराव करतात. मात्र यामागे कुठले पक्ष आहेत. याची माहिती आमच्याकडे आली आहे. त्या ४८ गावांना आम्ही २ हजार कोटींची योजना मंजूर केली.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.