Eknath Shinde । “आपली लोकं थांबवून ठेवण्यासाठी…”; उद्धव ठाकरेंच्या मध्यावधी निवडणुकांच्या भाकितावर एकनाथ शिदेंची प्रतिक्रिया
Eknath Shinde । मुंबई : गुजरातच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत महाराष्ट्रात येणारे जमिनीवरील प्रकल्प तिथे ओरबाडून नेले. आणि आता अचानक पंतप्रधानांच्या तोंडातून महाराष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त होऊ लागलं आहे. जमिनीवरील प्रकल्प गुजरातला आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्रात आणले जात आहेत. हे प्रकल्प जाहीर केल्यानंतर या प्रकल्पांचा भ्रमाचा भोपळा फुटण्याआधी मध्यावधी निवडणुका जाहीर होऊ शकतात असं भाकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलंय. त्यांच्या या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे म्हणाले, “त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आपल्याकडील आमदार, लोकप्रतिनिधी सोडून जाता कामा नये यासाठी ते अशी वक्तव्यं करत आहेत. आघाडीतील पक्षही शिवसेना आमचा नैसर्गिक मित्रपक्ष नसल्याचं म्हणत आहे. काँग्रेसमधील २२ जण भाजपात जाणार, तसंच काही लोक फुटून बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाणार असल्याचं बोललं जात आहे. आपली लोकं थांबवून ठेवण्यासाठी संभ्रम निर्माण करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली आहे.
पुढे ते म्हणाले, “आम्हाला निवडणुकांची भीती नाही. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काम करत नसल्याने आम्हाला त्याची तयारी करण्याची गरज नाही,” असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणालेत. तसंच, मध्यावधी निवडणुकांचं लॉजिक काय? हा संभ्रम का निर्माण करत आहात? असा सवालही त्यांनी केलाय.
“आपलं १७० आमदारांचं मजबूत सरकार आहे. अडीच वर्ष पूर्ण ताकदीनं काम करु आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु हे त्यांना माहिती आहे. म्हणून ते घाबरले असून अशी विधानं करत आहेत. अडीच वर्षानंतर जनता काम करुन देणाऱ्या लोकांनाच निवडून देणार आहे. तेव्हा आमच्या २०० हून अधिक जागा येतील”, असा दावा शिंदेंनी केला.
महत्वाच्या बातम्या :
- Prashant Damle | प्रशांत दामले यांना पद्म पुरस्कार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
- Shrikant Shinde | “मध्यावधी निवडणुकांची वक्तव्य म्हणजे…”, तयारीला लागलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राचं प्रत्युत्तर
- Uddhav Thackeray | “मशालच्या पहिल्या विजयानंतर मिंधे गट…”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- Gulabrao Patil | “… म्हणून ऋतुजा लटकेंचा विजय झाला”, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया
- Bharat Jodo Yatra | अखेर प्रतिक्षा संपली! राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आजपासून महाराष्ट्रात, काँग्रेसकडून जोरदार तयारी
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.