Eknath Shinde । दोन मुख्यमंत्र्यांची सवय तुम्हाला होती, आम्ही तुमचा रिमोट काढून घेतला; शिंदेंचा टोला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकार आणि निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्यावर भाष्य केलं आहे. सध्या राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक मुख्यमंत्री जे मंत्रालयात बसून काम करू शकेल आणि दुसरे मुख्यमंत्री जे वेगवेगळ्या पद्धतीने फोटोसेशन आणि गणपती दर्शन करत बसतील, असा टोला सुळेंनी एकनाथ शिंदे यांना लगावला होता. यावर आता स्वतः एकनाथ शिंदे यांनी सुळेंच्या या टीकेला प्रत्युत्तर दिल आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

शिंदे म्हणाले कि, दोन मुख्यमंत्र्यांची सवय तुम्हाला होती, आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण आणि निर्णय कोण घ्यायचे, रिमोट कोणाचा चालायचा हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे दोन मुख्यमंत्र्यांची सवय तुम्हाला होती. पण आम्ही ५० जणांनी तुमचा रिमोट कंट्रोल काढून घेतला, असा टोला त्यांनी लगावला. पुढे अजित पवार, जंयत पाटली, सुप्रिया सुळे यांच्यावर शिंदे यांनी टीका करतांना मला तुमच्या भानगडीत पडायचे नाही, मी राज्याच्या हितासाठी काम करत राहणार, लोकांमध्ये जात राहणारच, असे ठणकावून सांगितले.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या होत्या ?

सध्या राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक मुख्यमंत्री जे मंत्रालयात बसून काम करू शकेल आणि दुसरे मुख्यमंत्री जे वेगवेगळ्या पद्धतीने फोटोसेशन आणि गणपती दर्शन करत बसतील, असा टोला सुळेंनी एकनाथ शिंदे यांना लगावला होता. तसेच पुढे मी स्वतः अनेक मंत्र्यांना माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या कामासाठी वेळ मागितला, मात्र, ते वेळ देत नाहीत. याचा अर्थ प्रशासन गेल्या अडीच महिन्यांपासून ठप्पा आहे, हे सरकार ज्या पद्धतीने सांगितलं जातं ओरबडून आणि चुकीच्या पद्धतीने आलेला आहे आणि त्याचा परिणाम प्रशासनावर होताना दिसत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

शिक्षकांचा मुद्दा खरतर अत्यंत गंभीर आहे. त्याबद्दल शालेय शिक्षण मंत्र्यांनी बोलावं असा सल्लाही सुळे यांनी दिला आहे. यावेळी सुळेंनी मंत्रईपदांवर देखील टीका केली. अजून पालकमंत्री नाही, अजितदादा ज्यावेळेस पालकमंत्री होते त्यावेळेस पुण्यामध्ये ते सकाळपासून काम करायचे, मात्र आता पालकमंत्री नाहीये त्यामुळे कशा पद्धतीने कामकाज ठप्प आहे, आरोग्य मंत्री म्हणून राजेश टोपेंनी जे काम केलं ते आपण बघितलं. अख्या देशाने ते काम बघितलेलं आहे. पण आताचे आरोग्य मंत्री फक्त वादातच असल्याचा आपल्याला पाहायला मिळतात, असं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.