Eknath Shinde । मंत्रिमंडळाच्या विस्तारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले…
Eknath Shinde । नागपूर : राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळून शिंदे-फडणवीस यांनी शपथ घेऊन ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला. मात्र, अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधक सरकारवर या मुद्द्यावरुन सडकून टीका करत असतात. येत्या काही दिवसांतच राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होणार आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकारला स्थापन होऊन तीन महिन्यांपेक्षा अधिकचा काळ लोटला आहे. परंतु मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाल्यानंतर अजूनही दुसरा विस्तार करण्यात आलेला नाही. त्यामुळं आता शिंदे गटासह भाजपमधील नाराज नेत्यांचं मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्ताराकडे लक्ष लागलेलं आहे. त्यातच आता विदर्भ दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर होईल ना. योग्यवेळी सर्व गोष्टी होत राहतात, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या विस्तारात विदर्भाला स्थान मिळेल का? असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावर, मंत्रिमंडळ विस्तारात सर्वांचा विचार केला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पालकमंत्री असताना माझं विकासांचं टार्गेट होतं. त्यावेली मी दरवर्षी गडचिरोली पोलिसांसोबत दिवाळी साजरी करत होतो. आज मी मुख्यमंत्री आहे. पण गडचिरोलीचा पालकमंत्री असताना सुरू केलेलं काम मी अजूनही सुरू ठेवलं आहे. अतिदुर्गम भागात पोलीस नक्षलवाद्यांशी लढून आपलं संरक्षण करतात. त्यांना दिवाळीचा आनंद घेता यावा हाच उद्देश आहे. आज भामरागड आऊटपोस्टमध्ये पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहे. त्यामुळे पोलिसांचं मनोबल वाढेल, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Gunratna Sadavarte । गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून ‘सामना’वर बंदीची मागणी ; काय आहे नेमकं प्रकरण?
- Karan Kundra & Tejasswi Prakash | करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या दिवाळी लूकला चाहत्यांकडून मिळाले भरभरून प्रेम
- Kishori Pednekar । “मे महिन्यात तुम्ही जे फटाके फोडले त्याचे…”; एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर पेडणेकरांचा टोला
- Soler Eclipse | सूर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी काय करावे, जाणून घ्या!
- Aurangabad | अब्दुल सत्तारांचा दौरा संपताच पंचनामे करणारे पथक देखील गायब
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.