Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद आणि पुणे दौरा रद्द?

Eknath Shinde | मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आज औरंगाबाद आणि पुणे दौऱ्यावर जाणार होतो. मात्र, त्यांच्या विमानात तांत्रिक बिगड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जवळपास अर्धा तास मुंबई विमान तळावर प्रतीक्षालयात थांबावे लागले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा एकत्रित औरंगाबाद दौरा होता. मात्र, विमानात तांत्रिक बिघड झाल्यामुळे हा दौरा जवळपास रद्द झाला आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या गाडीने पुण्याला रवाना झाले आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानतळावरून ठाण्याला गेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा एकत्रित औरंगाबाद दौरा रद्द झालेला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली गाडी घेऊन बाय रोड पुण्याच्या दिशेला रवाना झाले आहेत. तर मुख्यमंत्री औरंगाबाद दौरा रद्द करून ठाण्याला गेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी पुण्याला जाणार आहे. विमान दुरुस्त व्हायला जवळपास दोन ते तीन तास वेळ लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा औरंगाबाद दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी अजित पवारांनी एकनाथ शिंदे एका व्यासपीठावर येणार होते. त्यामुळे या दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष होते. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा रद्द झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाय रोड पुण्याला जाणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात पोहोचतील की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या